शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचा भगवा सप्ताह.
वणी:- शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वणी विधानसभेचे पक्ष प्रमुख संजय देरकर यांच्या नेतृत्वात भगवा सप्ताहाचे आयोजन ४ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट दरम्यान करण्यात आले आहे.
वणी विधानसभा क्षेत्रात शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे पक्ष प्रमुख यांच्या वाढदिवसानिमित्त वणी विधानसभा मतदार संघात विधासभेचे प्रमुख संजय देरकर यांच्या नेतृत्वाखाली भगवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.
या भगव्या सप्ताहात वणी विधानसभा मतदारसंघात गावागावात शिवसेना(उ.बा.ठा.) पक्षाचे फलक अनावरण, शिवसैनिकांच्या भेटीगाठी, पक्ष प्रवेश, जेष्ठ शिवसैनिकांचा सत्कार,सदस्य नोंदणी अभियान, माझा वीज माझा अधिकार, आणि गावागावात मतदार यादी वाचन असे कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
वरोरा रोडवरील कार्यालयातून होणार सुरुवात!
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जनसंपर्क कार्यालय वरोरा रोड संत जगन्नाथ महाराज नंदेश्वर मंदिर येथे ११ वाजता महाआरती होणार आहे.
त्यानंतर जनसंपर्क कार्यालयातून भगव्या सप्ताहाची सुरुवात होणार आहे.
या अभियानात सर्व शिवसैनिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी केले आहे.

%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%20%E0%A4%AD%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%BE%20%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B9.%20(1).jpg)